पैशाच्या कारणावरून दांम्पत्याकडून मारहाण..

करमाळा : पैशाच्या कारणावरून दांम्पत्याकडून एकास काठीने मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार २५ ऑक्टोबरला रात्री साडेसात वाजता वरकटणे (ता.करमाळा) येथे घडला आहे.
यात आप्पा हरिदास देवकर (रा.वरकटणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की वड़ीलांनी मला दोन म्हशी दिलेल्या होत्या. माझा भाऊ सचिन हा पुणे येथे ट्रकवरती ड्रायव्हर म्हणून काम करतो. तो गेल्या चार-पाच महिन्यापासून गावी आला आहे. तो मला म्हैस मागत होता त्यावेळी म्हैस सांभाळण्याचे पैसे दे.. असे म्हणालो असता ते त्याला मान्य नव्हते.
या कारणावरून त्याने व त्याची पत्नी सोनाली दोघांनी काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.


