मागील १५ वर्षात केलेल्या कामांमुळे आमचीच सत्ता येणार – अजित तळेकर
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – मागील १५ वर्षात केम ग्रामपंचायतीत केलेल्या चांगल्या कामाची पोहच पावती म्हणून केम मधील जनता आम्हाला पुन्हा मत देऊन काम करण्याची संधी देणार असल्याचा विश्वास अजित तळेकर यांनी दिला.
केम गावचे जेष्ठ नेते दिलीप तळेकर व सत्ताधारी गटाचे नेते अजित तळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसंभो ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. पॅनल प्रमुख अजित तळेकर यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा नेतृत्व सिद्ध करण्यासाठी मोर्चे बांधणी करून ग्रामपंचायत निवडणुकीत १७ उमेदवार व सरपंच पदासाठी सारिका कोरे यांना उमेदवारी दिली. मागील पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा जास्तीत जास्त मतानी सरपंच पदाचे उमेदवार निवडून आणून पुन्हा एकदा सत्ता आणू अशी ग्वाही त्यांनी दिली.
माजी उपसरपंच नागनाथ तळेकर यांनी आपल्या भाषणात गेली १५ वर्ष एक हाती सत्ता स्थापन करून अजित तळेकर यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. पुढे बोलताना ते म्हणाले की, १५ वर्षातील या कामावर आम्ही मते मागत आहे. विरोधक केवळ अजित तळेकर यांना विरोध करण्यासाठी एकत्र येत आहेत त्यांनी काढलेला जाहिरनामा फसवा आहे. त्यांनी काढलेल्या जाहिरनामा मधील कामे झाली आहेत. त्यांनी आजपर्यंत केम गावात केलेली कामे सांगावित.
या प्रसंगी जेष्ठ नेते दिलीप तळेकर म्हणाले गावांतील पुढारी जरी एकत्र आले तरी जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. जनतेच्या जिवावर आम्ही १५ वर्ष झाले सत्तेत आहोत. या वेळेला सुध्दा जनता आम्हाला निवडून देईल आम्ही गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत अजितदादा तळेकर यांनी प्रत्येक वाडया वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. आपले गावचे ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्र दर्जा मिळवून दिला आहे. रोपळे-केम-कंदर रस्ता मंजूर साठी प्रयत्न सुरू असून या रस्त्याचे काम लवकरच होणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ तळेकर यांनी केले या वेळी माजी जि,प, अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे माजी सभापती शेखर गाडे प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख सागर पवार उपस्थित होते.
संबंधित बातम्या : केम ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक जागेसाठी दुरंगी लढत
केम ग्रामपंचायतीमध्ये यंदा परिवर्तन होणे अटळ – जनता आमच्या पाठीशी – अच्युत तळेकर