वाल्मिकी मित्र मंडळाकडून ‘वाल्मिकी जयंती’ उत्साहात साजरी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – २८ ऑक्टोबर रोजी करमाळा येथील वाल्मिकी मित्र मंडळाकडून ‘वाल्मिकी जयंती’ उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
वाल्मिकी चौकात (कानाड गल्ली) येथे मंडप लावण्यात आला होता. मंडप मध्ये वाल्मिकी ऋषींचा मोठा फोटो लावून फोटोचे पूजन करण्यात आले. सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. याचबरोबर वाल्मिकी मित्र मंडळाकडून श्री देवीचामाळ येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले.
यावेळी सचिन घोलप ,सौरभ माने, सूर्यकांत घाडगे, प्रशांत माने, कुमार माने, मनोज राखुंडे, सोमनाथ साने, प्रदीप माने, शाम घाडगे, आकाश साने, अजय साने, अक्षय घाडगे, नयन साने, परशुराम माने, सागर राखुंडे, आश्रोबा माने, आलोक माने,रुद्रांश माने,ऋतुराज माने,रुद्रेश माने,कृष्णा अभंगराव, रोहन माने, प्रथमेश माने, मयूर माने, अविनाश घाडगे, रियाज पठाण, सुनील साने, कृष्णा कोळी (मांगी) सुधीर कांबळे (मांगी) नारायण कोळी (झरे) संतोष घोरपडे(कुंभेज) बाळासाहेब कोळी (वीट) शिवाजी माने (तरडगाव) अरुण माने (तरडगाव) बाळासाहेब माने (तरडगाव)महेश घाडगे,दिनेश माने,उमेश माने, आतिश माने, आयोग पठाण, निलेश माने, सुहास माने, गणेश माने आदीजन उपस्थित होते.




