करमाळा तालुक्यातील रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रमांतर्गत 2 कोटी 50 लाख निधी मंजूर : आ.संजयमामा शिंदे - Saptahik Sandesh

करमाळा तालुक्यातील रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रमांतर्गत 2 कोटी 50 लाख निधी मंजूर : आ.संजयमामा शिंदे


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सन 2023 -24 या आर्थिक वर्षांसाठी लेखाशीर्ष 30 54 – 24 19 रस्ते व पूल परिरक्षण कार्यक्रमांतर्गत गट ब व गट मधील कामांना दिनांक 31 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयांतर्गत प्रशासकीय मंजूरी मिळाली असून सोलापूर जिल्ह्यासाठी एकूण 22 कोटी रुपये निधी मंजूर असून त्यापैकी करमाळा तालुक्यासाठी 2 कोटी 50 लाख निधी मंजूर असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले की, करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते मजबुतीकरण करणे तसेच पूल बांधणे या कामासाठी गट ब व गट क मधून 12 कामांना निधी मंजूर झालेला असून यामध्ये बोरगाव दिलमेश्वर जिल्हा हद्द रस्ता ग्रामा.66, पोपळज ते सोगाव पूर्व रस्ता ग्रामा 79, गुळसडी ते शेलगाव क रस्ता ग्रामा 41, कुंभारगाव ते हिंगणी रस्ता ग्रामा 12 ,झरे (पोफळज )ते हजारवाडी रस्ता ग्रामा 259, बिटरगाव श्री ते भोसले वस्ती ग्रामा 163, निमगाव टे ते सापटणे ग्रामा 139, उमरड ते झरे रस्ता ग्रामा 208, सौंदे ते सरपडोह रस्ता ग्रामा 40, बिटरगाव ते शिंगेवाडी रस्ता ग्रामा 22, कोंढार चिंचोली ते गाडे वस्ती ग्रामा 275 या रस्त्यांसाठी 2 कोटी 50 लाख निधी मंजूर असून या निधीमधून रस्ते व पूल यांच्या मजबुतीकरणाची कामे होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा गावागावांना जोडण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!