करमाळा येथील पार्वती चिवटे यांचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील पार्वती सदाशिव चिवटे यांचे वृद्धोपकाळाने आज (दि.१०) निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ८० होते. त्यांच्या पश्चात चार मुले व दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर शिवकेय संस्कार करण्यात आले.
कै.सदाशिव चिवटे व पार्वती चिवटे या उभयंत्यांनी रेवडी उत्पादन व पेढा उत्पादन या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचा नावलौकिक कमावला होता. करमाळा तालुक्यात चिवटे मिठाईवाले व चिवटे भेळ म्हणून त्यांचा व्यवसाय प्रसिद्ध आहे. निजाम काळातील अनेक शस्त्र त्यांच्याकडे असून संदलच्या काळात याची रीतीरीवाज प्रमाणे पूजा त्या करत असत. हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक म्हणून दरवर्षी ते संदल उत्सव पार्वती चिवटे साजरा करीत होत्या.स्व.पार्वती चिवटे यांच्या अंत्यसंस्कारावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख शिवकुमार चिवटे व करमाळातील संस्कृती मित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित चिवटे यांच्या त्या आजी होत्या.



