१५ नोव्हेंबरला करमाळा तालुक्यात जरांगे-पाटील यांची सभा – १७० एकर जागेत केली व्यवस्था
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील वांगी नं १ येथे बुधवारी दि १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे या सभेची मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी सुरू झाली आहे या सभेसाठी १७० एकर जागेची व्यवस्था केली आहे गाडया पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी मराठा समाजाच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यानी १५ नोव्हेंबर पासून महाराष्ट्र दौरा आयोजित केला आहे १५ नोव्हेंबरलाच करमाळा तालुक्यात त्यांची सभा होणार आहे या सभेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यानी उपोषण केले होते याला पाठिंबा देण्यासाठी करमाळा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने चक्री उपोषण केले होते. या उपोषणाला तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. करमाळा तालुक्यातील प्रा.रामदास झोळ यानी अंंतरवाली सराटि येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती तसेच वांगी नं १ येथे उदयसिंह देशमुख यांनी उपोषण केले होते. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील याची करमाळा तालुक्यात सभा होणार आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.