रामवाडी येथील रेल्वे भुयारी रस्त्याचे उद्घाटन संपन्न – रस्ता वाहतुकीस खुला
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – रामवाडी (ता.करमाळा) येथील रेल्वे गेट नं २५ च्या भुयारी रस्ता काँक्रेटीकरण पूर्ण होऊन या रस्त्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सवितादेवी राजेभोसले यांचे हस्ते करण्यात आला.
रामवाडी येथील रेल्वे गेट नं २५ भुयारी रस्ता काँक्रेटीकरण व बाजूच्या भिंतीच्या १ कोटी २३ लाख रुपये निधी मंजूर होऊन सादर रस्त्याचे काँक्रिटीकरणचे काम पुर्ण होऊन बाजूच्या भिंतेचे काम काही दिवसात पुर्ण होणार आहे. सदर रेल्वे गेट सोलापूर-नगर व पुणे या तीन जिल्ह्याच्या बॉर्डरवर असून सद्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. सदर भुयारी रस्ता काँक्रेटीकरण झाल्यामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.
हा रस्ता पूर्णत्वासाठी खासदार रणजितसिंह निंबाळकर, डी.आर.एम.निरंजनकुमार दोहरे,सिनिअर डी.इ .एन चंद्रभूषण, डी. आर.एम सचिव ताजुद्दीन हुडेवाले यांनी प्रयत्न केले होते.