२६ नोव्हेंबर पासून कमलाभवानी देवीची विविध वाहनांवर मिरवणूक – कुस्तीचा आखाड्याचेही आयोजन
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – येत्या 26 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान करमाळा येथील श्रीदेवीचामाळ येथे कमलादेवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये कमला देवीची छबिना यात्रा गरुड, नंदी, काळवीट, मोर, सिंह, घोडा, हत्ती, सप्तमुखी घोडा आदी वाहनांबरोबर विविध दिवशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. याचबरोबर कुस्त्यांचा आखाडा देखील या उत्सवानिमित्ताने आयोजित केलेला आहे, अशी माहिती कमलादेवी यात्रा समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
- रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी चार ते सहा या वेळेत गरुड या वाहनावर तर रात्री नऊ ते दहा या वेळेत सिंह या वाहनावर देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे.
- सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत छोट्या नंदीवर तर रात्री नऊ ते दहा या वेळेत मोठ्या नंदिवर देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे.
- दिनांक 28 नोव्हेंबर रोजी दुपारी चार ते सहा यावेत काळवीट या वाहनावर तर रात्री नऊ ते दहा या वेळेत घोडा या वाहनावर देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे.
- बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी चार ते सहा या वेळेत मोरावर तर रात्री नऊ ते दहा या वेळेत लहान हत्तीवर देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढली जाणार आहे.
- गुरुवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी सप्तमुखी घोडा, पाच वाहन, मोठा हत्ती यांच्या वर रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी मुख्य यात्रा होणार आहे.
- शुक्रवार दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी ठीक तीन वाजता कुस्त्यांचा आखाडा आयोजित केलेला आहे.
करमाळा तालुक्यातील कलगीतुरे, शाहीर, कलावंत मंडळी, सर्व गणेश उत्सव मंडळाचे संघ, झांजपथक, आराधी मंडळ, आदींनी हजेरी लावून यात्रेचे शोभा वाढवावी असे आवाहन राजेरावरंभा तरुण मंडळ संलग्न कमलादेवी यात्रा समिती व समस्त ग्रामस्थ मंडळी श्रीदेवीचामाळ (ता.करमाळा जिल्हा सोलापूर) यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.