कंदर येथे मटका चालकावर गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : कंदर येथे मिलन मटका नावाचा जुगार चालविणाऱ्या व्यक्ती विरूध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २३ नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता घडला आहे. यात पोलीस नाईक प्रमोद पंढरीनाथ गवळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की कंदर येथे मटका सुरू असल्याची माहिती कळाल्यावर आम्ही तेथे गेलो असता एसटी स्टॅन्डच्या जवळ विठ्ठल विश्वनाथ लोकरे (रा. कंदर) हा मिलन मटक्याच्या चिठ्ठ्या फाडताना आढळून आला. त्याच्याकडे पांढण्या रंगाची स्लीप, पुस्तक, बॉलपेन, १०५० रू. रोख असे जुगारीचे साहित्य सापडले आहे.