हजारोंच्या उपस्थितीत करमाळ्यात 'संविधान बचाव मोर्चा ' उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

हजारोंच्या उपस्थितीत करमाळ्यात ‘संविधान बचाव मोर्चा उत्साहात संपन्न

करमाळा ( संदेश प्रतिनिधी) – काल (२६ नोव्हेंबर) संविधान दिनी करमाळा येथे “संविधान जिंदाबाद, मनूवाद मूर्दाबाद” अशा घोषणा देत नागरीकांनी संविधान बचाव मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. आरपीआय (आ) चे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांनी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता. या मोर्चामध्ये शहरातील प्रमुख रस्त्यांवरून सर्व महापुरूषांच्या पूतळ्यांना अभिवादन करत हा मोर्चा तहसिल कचेरीवर पोहोचल्यानंतर मोर्चा चे रूपांतर सभेमध्ये झाले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नागेश कांबळे म्हणाले कि, “जोपर्यंत प्रत्यक्ष ब्राम्हणशाही विरोधात आपण लढत नाही तोपर्यंत इथले प्रश्न संपणार नाहीत. राज्यघटनेत ओबीसी व मराठा आरक्षणाची तरतूद आहे परंतू ब्राम्हणवादी शक्ती जाणूनबुजून मराठा व ओबीसी बांधवात भांडण लावत आहेत. भारतीय राज्यघटना सर्वसामान्यांचे हित साधणारी आहे.परंतू ब्राम्हणी वर्चस्व नाकारणारी आहे म्हणून ती बदलण्याची कपटी कारस्थाने चालू आहेत ती बहूजन समाज कदापी बदलू देणार नाही. मराठा व ओबीसी बांधवांनी घरात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो अन भारतीय संविधान ठेवावा. ब्राम्हणवादी तूमच्या आरक्षणाला हात लावू शकणार नाहीत” असे देखील नागेश कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या सभेला, 2018 साली दिल्ली येथे संविधानाची प्रत जाळल्याचा निषेध म्हणून राजस्थान हायकोर्ट समोरील मनूच्या पूतळ्याला काळे फासणा-या कांताबाई अहिरे व शिला पवार यांची उपस्थिती हा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरल्या. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. धनगर समाज आरक्षण कृती समिती,मूस्लिम समाज,संभाजी ब्रिगेड,नाभिक समाज,वैदू समाज,भारत मुक्ती मोर्चा,ओबीसी संघटना,मातंग एकता आंदोलन इ संघटनांनी या संविधान बचाव रॅलीला पाठिंबा देत उपस्थिती दर्शवली.

यावेळी प्रा शिवाजीराव बंडगर,पूणे आरपीआयचे दिपक शेलार, अल्ताफ कूरेशी, उद्योजक संभाजी ब्रिगेड चे नितिन खटके,पंढरिनाथ साटपे,मराठा आघाडीचे शिवाजी शिंदे, विलासराव घूमरे सर ,सौ प्रज्ञा कांबळे,आर आर पाटील, भिमराव कांबळे, माजी नगराध्यक्ष दिपकराव ओहोळ, लक्ष्मणराव भोसले, प्रफुल्ल दामोदरे, डॉ आंबेडकर यूथ असोसिएशनचे संस्थापक उत्तम भैय्या नवघरे, कर्जत चे नगरसेवक भास्कर भैलूमे,जामखेड चे नेते विकी भाऊ सदाफूले,यूवा जिल्हाध्यक्ष इ ची भाषणे झाली, मोर्चा च्या यशस्वीते साठी मयूर कांबळे आकाश गायकवाड, प्रसेनजित कांबळे, विजय वाघमारे,शिवाजी शिंदे, किशोर कांबळे, रणजित कांबळे, दत्ता बडेकर,नंदू कांबळे इ.नी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!