लग्न वाढदिवसानिमित्त केम मधील मूकबधिर शाळेत विद्यार्थ्यांना केले खाऊ वाटप
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – प्रहार संघटनेचे संपर्क प्रमुख व केम येथील रहिवासी सागर पवार व त्यांच्या पत्नी सौ निकिता पवार यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस केम येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर केक कापून व खाऊ वाटप करून साजरा केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी सरपंच सौ सारिका कोरे होत्या तर प्रमुख पाहुणे रमजान मुलाणी होते सुरूवातीला या पाहुण्याचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्या नंतर प्रशालेच्या वतीने यांचा सत्कार करण्यात आला या सागर पवार व सौ निकिता पवार या जोडप्याचा जाधव मॅडम व मुख्याध्यापक नाळे यांनी सत्कार करून त्यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य नागनाथ तळेकर म्हणाले की आज आपण पाहतो वाढदिवसा निमित्त पार्टी, फटाक्यांची आतषबाजी हा वायफळ खर्च टाळून सागर पवार यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवसा निमित्त या गरिब मतिमंद विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून या विद्यार्थ्यां बरोबर वाढदिवस केला साजरा आजच्या तरूण पिढीने आदर्श घेण्यासारखा आहे तसेच त्यानी आमदार बच्यू कडू राज्य मंत्री विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ते रात्र,दिवस जनतेची सेवा करतात त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या वेळी माजी सरपंच अजित दादा तळेकर, बबलू धोत्रे, किशोर जाधव नाथा चव्हाण,अमित अवघडे नागू बाभुलकर, साई गिरी विजय पवार उमेश शिंदे शेखर धौत्रे करण धौत्रे उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पाटील सर यांनी केले तर आभार प्रशालेचे मुख्याध्यापक नाळे सर यांनी केले