प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयात रोजगार मेळाव्याअंतर्गत 6 विद्यार्थ्यांची निवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथील प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालयामध्ये सहा डिसेंबर रोजी संस्थेच्या अध्यक्षा मा. पद्मजादेवी मोहिते – पाटील व जिल्ह्याचे नेते डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय करमाळा व कमलाभवानी ग्लोबलकॉर्प लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
या मेळाव्याची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व संस्थापक लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या मेळाव्यासाठी करमाळा व आसपासच्या परिसरातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. व त्यामधून ०६ विद्यार्थ्यांची लॅब, आर. ओ व ई.टी.पी. या विभागासाठी केमिस्ट या पदासाठी निवड करण्यात आली.
या मेळाव्यासाठी कमलाभवानी ग्लोबल कॉर्प लि. तर्फे श्री. चंदनसिंग पाटील, श्री. विनोद जाधव, श्री. शरद कोयले, श्री. रवींद्र विघ्ने, श्री. गणेश गायकवाड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा.अरुण चोपडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रवीण देशमुख उपस्थित होते, तसेच या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.