प्रा.अश्विनी भोसले- ओहोळ यांना कॅन्सरवरील विशेष संशोधनाबद्दल भारत सरकारकडून पेटंट बहाल.. - Saptahik Sandesh

प्रा.अश्विनी भोसले- ओहोळ यांना कॅन्सरवरील विशेष संशोधनाबद्दल भारत सरकारकडून पेटंट बहाल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर, पुणे येथे कार्यरत असलेल्या प्रा. अश्विनी भोसले – ओहोळ यांनी कॅन्सरवरील केलेल्या विशेष संशोधनाबद्दल त्यांना नुकतेच भारत सरकारकडून पेटंट बहाल करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात अतिशय मेहन घेऊन त्यांनी एक इन्स्ट्रूमेंट तयार केले होते. ज्यामुळे एखाद्याला फुफ्फुसाचा कॅन्सर आहे का नाही याचे निदान केले जाते.

आजकाल कॅन्सरचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो, ही काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी समाजपयोगी असे मशीन तयार केले आणि त्यांच्या गौरवास्पद कार्याची दखल भारत सरकारने घेऊन त्यांना स्मार्ट लंग कॅन्सर डिटेकटींग डिव्हाईससाठी पेटंट बहाल केले आहे. याचबरोबर त्यांच्या आणखी दुसऱ्या संशोधनाला लंडन येथील पेटंटही मिळालेले आहे.

पोर्टेबल डिव्हाईस युज्ड फॉर इन कॅन्सर डिटेक्शन साठी त्यांना inteellectual property office united kingdome लंडन यांचेकडून पेटंट मिळाले आहे. साडे येथील डॉ. अशोक भोसले व सुनिता भोसले यांच्या त्या कन्या असून प्रा.संभाजी ओहोळ यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतूक केले जात आहे. या सर्व मेहनतीसाठी पती संदीप ओहोळ यांचे अनमोल सहकार्य लाभत असल्याचे सौ. अश्विनी भोसले-ओहोळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!