शेलगाव (क) येथे 'संघर्ष महिला' ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन.. - Saptahik Sandesh

शेलगाव (क) येथे ‘संघर्ष महिला’ ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन..


करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.११) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत शेलगाव क (ता.करमाळा) येथे आज 11 डिसेंबर रोजी संघर्ष महिला ग्राम संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन तालुका अभियान व्यवस्थापक योगेश जगताप यांचे हस्ते संपन्न झाले, यावेळी व्यासपीठावर प्रभाग समन्वयक आकाश पवार ,प्रभाग संघ व्यवस्थापक शंकर येवले, हनुमंत पवार, माजी सरपंच अशोक काटुळे, उपसरपंच लखन ढावरे, सचिन वीर ग्रामसेवक खाडे ,ग्राम संघाचे सचिव प्रियंका ढावरे, सीआरपी कविता वीर उपस्थित होते.


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मौजे शेलगाव क येथे 21 बचत गट कार्यरत असून त्यांचा संघर्ष महिला ग्राम संघ बनविलेला आहे. या ग्रामसंघाची स्थापना 1 जून 2018 रोजी झालेली होती. या संघासाठी ग्रामपंचायतीने समाज मंदिराची इमारत उपलब्ध करून दिली.त्या इमारतीसाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा शेलगाव क येथील राजश्री शाहू शेतकरी बचत गटाने उपलब्ध करून दिल्या तसेच या कार्यालयासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ ,सावित्रीबाई फुले ,महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या प्रतिमा शेलगावचे सरपंच आत्माराम वीर, उपसरपंच लखन ढावरे, माजी उपसरपंच सचिन वीर, नागेश ढावरे यांनी प्रतिमा भेट दिल्या.


महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला बचत गट व ग्राम संघासाठी विविध योजना राबविल्या जात असून त्यांना सोलापूर या जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत प्रशिक्षण दिली जातात त्याचा लाभ महिलांनी घ्यावा .आपल्या गटाचे व ग्राम संघाचे रेकॉर्ड अद्यावत ठेवावे. बचत गटाला, ग्राम संघाला उद्योग उभा करण्यासाठी शासकीय पातळीवरती मोठ्या प्रमाणावर अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे, कर्ज पुरवठाही केला जात आहे. वांगी जिल्हा परिषद गटांमध्ये केळी पिकावरती प्रक्रिया करणारी महिलांची कंपनी बचत गटाच्या माध्यमातून उभी राहत आहे .भविष्य काळामध्ये अशा अनेक कंपन्या या गटांच्या माध्यमातून उभा राहतील असे मत तालुका अभियान व्यवस्थापक योगेश जगताप यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आमदार संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ.विकास वीर यांनी केले. याप्रसंगी मंगल शिंदे, राणी शिंदे, कांताबाई जाधव, सुवर्णा जाधव, सविता काटुळे,ज्योती वीर, मंगल काळे, अनुराधा ढावरे, कोमल वीर, कविता वीर, सारिका वीर, राणी वीर, अश्विनी वीर ,कोमल माने ,वर्षा माने, सविता सपाटे ,उषा सपाटे, सुनीता माने ,आकांक्षा माने, त्रिषला वीर ,अशा वीर, सचिता वीर, जयश्री शिंदे ,रूपा बनसोडे कल्पना वीर, निर्मला वीर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!