करमाळा 'तहसीलदार'पदी 'शिल्पा ठोकडे' यांची नेमणूक.. - Saptahik Sandesh

करमाळा ‘तहसीलदार’पदी ‘शिल्पा ठोकडे’ यांची नेमणूक..

करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे


करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा (ता.१२) : येथील तहसीलदार म्हणून शिल्पा ठोकडे यांची नेमणूक झाली असून आजच त्या करमाळा तहसीलदार म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून करमाळा तहसीलदार पद रिक्त होते. श्रीमती ठोकडे यांच्या नेमणूकीने तालुकावासीयांची प्रतिक्षा संपली.

यापूर्वी श्रीमती ठोकळे माळशिरस येथील शेती महामंडळाकडे कार्यरत होत्या. शिल्पा ठोकडे यांची लेडीज सिंघम म्हणून सोलापूर जिल्ह्याला ओळख आहे. श्रीमती ठोकळे यांचा जन्म कुर्डूवाडी (ता. माढा )येथे झाला. बालपण व शिक्षण कुर्डूवाडीत गेले. त्या पदवीधर झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली होती व त्यामध्ये त्या निवडल्या होत्या.

त्यानंतर काही दिवस त्यांनी एस.पी.अशोक कामटे यांच्यासोबतही काम केले. दरम्यान त्यानंतर त्यांनी एमपीएससी मध्ये परीक्षा देऊन त्या तहसीलदारपदी निवडल्या. सुरुवातीला त्या सांगोला येथे नायब तहसीलदार म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यानंतर कोल्हापूर येथे पुरवठा अधिकारी म्हणून तर त्यानंतर दक्षिण सोलापूर येथे तहसीलदार म्हणून त्यांनी काम केले.

दक्षिण सोलापूर येथे कार्यरत असताना वाळू माफिया च्या कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. त्यानंतर आजरा तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या. अलीकडे माळशिरस येथील शेती महामंडळाकडे त्या कार्यात होत्या. करमाळा येथे गेले सहा महिन्यापासून तहसीलदार पदी रिक्त होते नेमके तहसीलदार कोण येणार..? याकडे तालुकावाशीयांचे लक्ष वेधले होते. त्यात श्रीमती ठोकडे यांची निवड झाल्याचे तालुक्यातील सर्वसामान्य वर्गातून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!