जि.प.केम शाळेच्या ‘शाळा व्यवस्थापन समितीचे’ पुनर्गठन – अध्यक्षपदी तळेकर यांची निवड
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – जि.प.केम केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आणासाहेब मच्छिंद्र तळेकर तर उपाध्यक्षपदी सौ सुजाता मनोज घोसे यांची बिनविरोध निवड झाली.
येथील जि.प.केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यासाठी पालक सभा सचिव तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वसंत चटटे यांच्या अध्यक्षतेखाली झाली सुरूवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रथम पालकातून सदस्यांची निवड करण्यात आली त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आणासाहेब मच्छिंद्र तळेकर उपाध्यक्ष पदी सौ सुजाता मनोज घोसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार मावळते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा हस्ते करण्यात आला या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चटे यानी शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य आणी जबाबदारी याची माहिती जाणीव प्रास्ताविकातून व्यक्त केली
या सत्कार प्रसंगी नूतन अध्यक्ष तळेकर म्हणाले या शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी व शाळेला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीन व माझी शाळा आदर्श कसी निर्माण होइल या साठी मी कटिबद्ध राहिल
या पालक सभेसाठी पालक वर्ग व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चट्टे यांनी केले तर आभार तुकाराम तळेकर यांनी मानले.