विज्ञान प्राविण्य परीक्षा 17 डिसेंबरला होणार – 500 विद्यार्थ्यांचा सहभाग..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील इयत्ता सहावी व नववी मधील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्राविण्य परीक्षा घेण्यात येणार आहे, ती परीक्षा रविवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत होणार आहे.
करमाळा तालुक्यात मधील विद्यार्थ्यांची सुद्धा ही परीक्षा होणार आहे अशी माहिती करमाळा तालुका विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्ष जनार्धन पाटकुलकर, सचिव संदीप पुजारी व परीक्षा प्रमुख दत्तात्रय भस्मे यांनी दिली सदर परीक्षेसाठी करमाळा तालुक्यातून 500 विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
करमाळा तालुक्यामध्ये ही परीक्षा महात्मा गांधी विद्यालय, करमाळा अण्णासाहेब जगताप विद्यालय, करमाळा. श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट. भारत हायस्कूल जेऊर, कन्वमुनी विद्यालय कंदर, डॉ.हेडगेवार विद्यालय, गौंडरे या ठिकाणी होणार आहे.
परीक्षेचे संपूर्ण नियोजन जिल्हाध्यक्ष संजय जवंजाळ, सचिव जब्बार शिकलगार, परीक्षा प्रमुख संतोष दोडयाळे व शितल कुमार पाटील यांनी केले आहे. तालुका स्तरावर ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संदीप पुजारी, दत्तात्रय भस्मे, अरुण नेटके, सूर्यवंशी, सुदाम नाळे यांच्यासह तालुक्यातील विज्ञान शिक्षक काम करीत आहेत.