केममधील मंगलदिप स्कूल मध्ये आनंदी बाजाराचे आयोजन - Saptahik Sandesh

केममधील मंगलदिप स्कूल मध्ये आनंदी बाजाराचे आयोजन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव)- केम येथील मंगलदिप पब्लिक स्कूल येथे ‘ आनंदी बाजार’ भरवण्यात आला होता. या बाजाराचे उदघाटन पत्रकार सचिन बिचितकर, नुतन ग्रा. प.केम. सदस्य विजयकुमार हेमंत ओहळ, योगेश गंगाराम ओहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

या ‘आनंदी बाजार’ मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यामध्ये श्री. संतोष देवकर, श्री. ज्ञानेश्वर देवकर, सौ.मनिषा पेटकर, सौ.मनिषा उघडे, सौ.व श्री. टकले, सौ.व श्री. टोणपे, दिपिका शहा, श्रीमती रंजना ओहोळ, सौ.दगडफोडे, सौ.कुरडे, सौ.पुजा भिल्ल, सौ.भोसले , सौ.गाडे , सौ.गोधडे, सौ.तळेकर. सौ.पळसकर, सौ.गोडसे, सौ.ओस्तवाल, सौ.अवघडे,सौ.चव्हाण मॅडम ‌यांनी उपस्थिती दर्शवली

विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी फळभाज्या, पालेभाज्या, स्वीट तसेच नाष्ट्यासाठी ढोकळा, वडापाव, पँटीस,भेळ, म्हैसूरपाक ,चहा असे सर्व प्रकारचे व्हरायटी विद्यार्थीनी आणले होते. जास्तीत जास्त नाष्टाचे पदार्थ खरेदीकडे पालकांचा कल दिसून आला. जास्तीत जास्त २ ते ४ हजारापर्यंत विक्री झाली. तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

यामध्ये कु.शिवानी गाडे, सौ.अश्विनी सुतार, सौ.अश्विनी पेठे तसेच श्री. प्रतिक अवघडे, यांचे सहकार्य लाभले. सर्वांनीच या कार्यक्रमात सहभागी होवून आनंद द्विगुणित केला. व मुलांना व्यवहार ज्ञान शिकवण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे यांनी सर्व उपस्थित पालकांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!