जिल्हास्तरीय टॅलेंट हंट समूहनृत्य स्पर्धेत श्री देवीचामाळ शाळेचे नेत्रदीपक यश.!
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जिल्हास्तरीय गुणवत्ता शोध चाचणी (टॅलेंट हंट) अंतर्गत समूहनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक श्री देवीचामाळ शाळेने नेत्रदीपक यश मिळवत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
मागील वर्षी टॅलेंट हंट स्पर्धेत श्री देवीचामाळ शाळेने वक्तृत्व, कथाकथन, चित्रकला,निबंध आणि समूहनृत्य स्पर्धेत तालुका स्तरावर उल्लेखनीय यश मिळत संपूर्ण स्पर्धेवर आपला दबदबा प्रस्थापित केला होता.
चालू शैक्षणिक वर्षात श्री देवीचा माळ शाळेची विद्यार्थिनी स्वरा चांदगुडे कथाकथन स्पर्धेत करमाळा तालुक्यातून द्वितीय, तर चित्रकला स्पर्धेत श्री देवीचा माळ शाळेच्या विद्यार्थिनी आरोही बिरंगळ तालुक्यातून प्रथम व ओजस्वी देवकर तालुक्यातून द्वितीय आल्याने शाळा प्रकाश झोतात आली आहे..
जिल्हा स्तरीय टॅलेंट हंट समूहनृत्य स्पर्धेत श्री देवीचा माळ शाळेने आपल्या यशाचा डंका वाजवत संपूर्ण जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक संपादन केला आहे..समूहनृत्य स्पर्धेत शाळेच्या वतीने एकूण १२ विद्यार्थ्यांचा चमू स्पर्धेत सहभागी झाला होता..
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अंजली निमकर,उपशिक्षक शितल गुंजाळ आणि हरिश कडू यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.