अपघाती वार-रात्री तिसरा अपघात विहाळ येथे-पीकअप ट्रॅक्टरची समोरासमोर धडक

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा (ता.२८) : कालचा (ता.27) बुधवार हा अपघाती वार ठरला असून, एका दिवसात तीन दिशेला तीन अपघात झाले. पांडे हाद्दीत पहाटे साडेपाच वाजता तवेराची कंटेनर ला धडक होऊन झालेल्या अपघातात चारजण ठार झाले. त्यानंतर जेऊर रेल्वेस्थानकाजवळ झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर रात्री साडेअकरा वाजता विहाळ (ता.करमाळा) येथे बसस्थानकाजवळ उसाचा ट्रॅक्टर व पीकअप यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. त्यात तिघेजण गंभीर झाले आहेत.

विहाळ येथे झालेल्या अपघातातील पिकअप हा आंबी,(ता.भूम ,जि. धाराशिव) असून, तेथील लोक आळंदी येथे लग्नाला गेले होते. हा अपघात इतका भीषण आहे की, पीकअपचा वरचा टफ उडून पडला आहे. त्यात 17 प्रवाशी होते. त्यातील तिघेजण गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघात झाल्याची माहिती समजताच विहाळ येथील नागरिकांनी तात्काळ मदत केली आहे. तसेच करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिसही तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. एकंदरीत कालचा दिवस अपघाती दिवस म्हणून चर्चेत राहिला आहे.
Related News – करमाळ्याजवळील अपघातात चार ठार – २० वर्षाच्या कार चालकावर गुन्हा दाखल

