‘शासनाने डुकरांचा बंदोबस्त करावा’ – केम परिसरातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

करमाळा (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील शेतकरी डुकरांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. मका,केळी, ज्वारी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

केम परिसरात जवळपास २०० एकर क्षेत्र लागवडीखाली येत आहे शेतकऱ्यांनी मका, ज्वारी,केळी, चे पिके घेतली आहेत. या वर्षी दुष्काळ जन्य परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी रात्रभर जागरण करुन पिकांना पाणी देऊन पोटच्या मुलाप्रमाणे संभाळली परंतु हि जनावरे उभ्या पिकात घुसून ज्वारी मुळासकट उपटून खाउन टाकून पिकांची नासाडी करत आहेत या बाबत शेतकऱ्यांनी केम ग्रामपंचायत, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही अद्याप ही तोडगा निघत नसल्याने त्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन दिले आहे यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

यावेळी राणी, तळेकर, शोभा तळेकर, स्वाती तळेकर, गुंफा तळेकर, रेणूका गुटाळ, विठ्ठाबाई, तळेकर विठ्ठल तळेकर, गणेश तळेकर, लक्ष्मण तळेकर, उत्तरेश्वर टोनपे, अंजना तळेकर, अच्युत काका पाटील, बापुराव नेते तळेकर, राजाभाऊ तळेकर, मनोज तळेकर, रमेश तळेकर पांडुरंग गुटाळ, हरिदास तळेकर, कुंडलिक तळेकर आदि उपस्थित होते.

