करमाळ्यात ४९ जनावरे दाटीने कोंडून घेवून जाणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
करमाळा (ता.29) : जनावरांना गर्दी करून उभे करणे, चारा-पाणी न देणे, औषधाची व्यवस्था न करणे, केवळ कत्तल करण्यासाठी त्यांना निदर्यपणे वागणूक देणाऱ्या दोघांविरूध्द करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार अजित दशरथ उबाळे यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २६ डिसेंबरला सायंकाळी पावणेसहा वाजता पोलीस उपनिरीक्षक माहूरकर यांना गायरानातील पत्राशेडमध्ये कत्तल करण्यासाठी गोवंश जातीचे जनावरे घेऊन जाणार असल्याचे समजले.
त्यानंतर आम्ही मौलालीमाळ येथे पोलीस हवालदार शेळके, पोलीस नाईक ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल काझी, शिंदे, जगताप, गटकुळ असे सर्व पंचासह खाजगी वाहनाने मौलालीमाळावर गेलो असता तेथे एका पत्र्याच्या शेड मध्ये ४६ लहान जर्सी गायीचे खोंडे दोन मोठे बैल व एक पांढरा खिल्लारी बैल अशी ४९ जनावरे दाटीने कोंडून त्यात चारापाण्याची सोय न करता औषधाची सोय न करता शाहरूख आयुब कुरेशी व अलिम रफिक कुरेशी दोघे रा.मौलालीमाळ यांनी आणून ठेवलेली होती.
या सर्वांच्या विरूध्द प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियमानूसार फिर्याद देण्यात आली आहे. यात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.