धैर्यशिल मोहिते-पाटील यांची देवी विद्यालयास भेट

केम (संजय जाधव ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत संकल्पनेतून,नेहरू सायन्स सेंटर मुंबई व शिवरत्न शिक्षण संस्था अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शन बसचे आयोजन करमाळा, सांगोला, माळशिरस, माढा, माण या तालुक्यात केले आहे. सध्या विज्ञान प्रदर्शन बस करमाळा शहरातील गिरधरदास देवी विद्यालय येथे असून या ठिकाणी धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी भेट दिली.
याप्रसंगी बोलताना मोहिते पाटील म्हणाले की, आतापर्यंत माळशिरस व करमाळा तालुक्यातील शाळेतील एकूण ११३१८ विद्यार्थी व शिक्षक यांनी विज्ञान बस प्रदर्शनाचा लाभ घेतला असून सायन्स शो, टेलिस्कोप या सारख्या विज्ञाननिष्ठ गोष्टी विद्यार्थ्यांना शिकण्यास मिळाल्या आहेत. तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती देखील होत आहे.
या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक संभाजी जगताप, अमरजित साळुंखे, डॉ.अमोल घाडगे, जगदीश अगरवाल, नितीन आढाव, नरेंद्र ठाकूर, शाम सिंधी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी इतर मान्यवर उपस्थित होते.



