लिड स्कुलच्या विद्यार्थ्यांची IIT मुंबई टेकफेस्टला भेट – शास्त्रज्ञांचे घेतले मार्गदर्शन

करमाळा (संदेश प्रतिनिधी ) – आशियातील सर्वात मोठ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सवाच्या 27 व्या आवृत्तीत या नवोदित मनांसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबईने जाहीर केलेल्या टेकफेस्ट 2023-24 सह हा कार्यक्रम विज्ञान, जादू आणि तंत्रज्ञान यांच्यातील चित्तवेधक परस्परसंवादाचे साक्षीदार लीड स्कुलचे विद्यार्थी झाले होते.
येथील CBSE मान्यता असलेल्या लीड स्कुल करमाळा कुर्डुवाडी, अक्कलकोट आदि शाळेमधील शेकडो विद्यार्थी लीड स्कूलचे अध्यक्ष नितीन जिंदाल, अकॅडमीकस अनन्या मॅडम , लीड स्कूलचे करमाळ्याचे प्राचार्य बपन दास यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठित टेकफेस्ट आयआयटी मुंबई 2023 महोत्सवात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी चंद्रयान -3 चे इस्रोचे डायरेक्टर श्री.सोमनाथ यांचे मार्गदर्शन घेतले. आशियातील सर्वात मोठ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सवात या आदर्श शास्त्रज्ञाचे मार्गदर्शन घेऊन अदभुत व गुढ विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले. येथे विद्यार्थ्यांची विविध शास्त्राची जागृती, विषयांचे कुतुहल याचे समाधान पहायला मिळाले.
या परिसंवादामध्ये देशातील अनेक नामांकित संस्थांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या संस्थेमध्ये दरवर्षी काही शाळांनाच सहभाग नोंदवण्यासाठी संधी मिळते. ही संधी सन 2023 -24 मध्ये लीड स्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळाली. या संस्थेकडून 28 डिसेंबर व 29 डिसेंबर या दोन दिवस कार्यक्रमात देशाच्या सुरक्षेतेसाठी वापरत येणाऱ्या ड्रोन बद्दल माहिती, रोबोट, सायन्स एक्जीबिशन त्याचबरोबर चंद्रयान -3 चे इस्रोचे डायरेक्टर श्री.सोमनाथ यांचे मार्गदर्शन यामध्ये लाभले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये येत्या पाच वर्षांमध्ये भारत 50 पेक्षा जास्त सेटलाईट अवकाशात सोडण्याचे लक्ष आहे. त्याचबरोबर आयआयटी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. योग्य दिशा ठरवण्यासाठी आयआयटी मुंबई या संस्थेत भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आपले करिअर ठरवण्याची मानसिकता तयार होते. आणि या संस्थेला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन निर्माण झाला.
या टेकफेस्ट मध्ये करमाळा कुर्डुवाडी, अक्कलकोट आणि माणगाव या लीड स्कुलमधील एकूण 96 विद्यार्थी व 13 शिक्षक यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी हसत खेळत या क्षेत्रातील विज्ञानाची माहिती आत्मसात केली. नवनवीन गुढ व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी लीड स्कूलचे अध्यक्ष नितीन जिंदाल अकॅडमीकस अनन्या मॅडम ,लीड स्कूलचे करमाळ्याचे प्राचार्य बपन दास, समन्वयक विनोद भांगे, अक्कलकोट स्कूलचे प्राचार्य दीक्षित गिरी, कुर्डुवाडी स्कूलचे शाळा व्यवस्थापक दिगंबर ताड, याबरोबर करमाळ्याचे लिड स्कुलचे रवींद्र झिंजाडे आदी स्टाफ यावेळी उपस्थित होते.



