मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनासाठी शंभर गाड्या देणार -प्रा.रामदास झोळ -

मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनासाठी शंभर गाड्या देणार -प्रा.रामदास झोळ

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी ) – ‌मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारी रोजी मराठा समाजाचे आंदोलक यांना बरोबर घेऊन ‌ मुंबईला जाणार असून करमाळा तालुक्यातुन मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या बांधवांना शंभर गाड्या ‌ देणार असल्याचे दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी बाराबंगले विकासनगर करमाळा येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करोडोच्या संख्येने आझाद हिंद मैदान मुंबई येथे दाखल होणार आहेत. 20 जानेवारी रोजी मराठा समाज बांधव आंदोलक यांना बरोबर घेऊन मनोज जरांगे पाटील हे कोणत्याही परिस्थितीत करोडो मराठा मावळा सोबत घेऊन जालन्यातील आंतरवाली सराटीतुन पायी मुंबईचे दिशेने भगवा वादळ घेऊन जाणार आहेत. ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बळी पडणार नाहीत हे त्यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. मराठा समाजाचे वादळ 20 जानेवारीपासून दरमजल करत 26 जानेवारी पर्यंत म्हणजे भारत देशाच्या प्रजासत्ताक दिनी मुंबई येथील आझाद मैदानावर धडकणार आहे तेथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावे म्हणून उपोषण सुरू करणार आहेत. सदर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून मराठा समाज बहुजन बांधव मोठ्या संख्येने जाणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी मराठा तसेच अनेक बहुजन बांधव जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत त्यांच्या प्रवासाची मोफत सोय करण्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्याकडून एक खारीचा वाटा म्हणून मराठा समाजाच्या या लढ्याला एक प्रकारची मदत म्हणून करमाळा तालुक्यातील नागरिकांना शंभर मोफत गाड्या देण्यात येणार आहे. तरी यासाठी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील इच्छुक समाज बांधवांनी प्रा. रामदास झोळ सर संपर्क कार्यालय बारा बंगले विकासनगर करमाळा येथे संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन प्राध्यापक रामदास झोळ यांनी केले आहे.

नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे देखील त्यांनी आवाहन केले

मो. 9405314296

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!