काकासाहेब नलवडे यांचे निधन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील बिटरगाव-वांगीचे माजी सरपंच व शिवसेनेचे जुने निष्ठावंत नेते पै.काकासाहेब कृष्णा नलवडे यांचे काल (दि.३) अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ७४ होते. तरुणपणी पैलवान असताना त्यांनी कुस्तीची अनेक मैदाने गाजवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन सुना असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने बिटरगाव(वांगी) परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.