वाढदिवसाचा वायफट खर्च टाळून कमलादेवी मंदीर संवर्धन समितीस सौ.थोरात यांनी दिली देणगी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथील रहिवासी सौ.प्रफुल्ललता अविनाश थोरात यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफट खर्च टाळुन करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री कमलादेवी मंदीर जतन संवर्धन कामास रोख रूपये ११०००/- (अकरा हजार रूपये) देणगी देऊन आपला वाढदिवस आणखीन संस्मरणीय बनवला आहे. सौ.प्रफुल्ललता थोरात या सेवानिवृत्त कृषी अधिकारी अविनाश थोरात यांच्या पत्नी आहेत.
श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्ट च्या संयोजनाने
श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या दोन महिन्यांपासून कामास सुरुवात करण्यात आली. असून ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी मदतीचे आवाहन भक्तांकडे केले असता भक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज श्रीकमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास
सौ.प्रफुल्ललता अविनाश थोरात यांनी देणगी दिली. यानिमित्त त्यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने करण्यात आला .मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉक्टर महेंद्र नगरे, विश्वस्त सुशील राठोड विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर ,विश्वस्त ॲड. शिरीषकुमार लोणकर ,मंदिर पुजारी,रोहित पुजारी, सचिन सोरटे, धनंजय सोरटे उपस्थित होते. प्रशासन अधिकारी महादेव भोसले व्यवस्थापक अशोक गाठे. उपस्थित होते.



