तहसीलदार ठोकडे यांनी पाडळी येथील जि.प. शाळेस भेट देत विद्यार्थ्यांशी साधला संवाद

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – जि. प. प्राथमिक शाळा पाडळी शाळेस करमाळा तालुक्याच्या तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी काल (दि.९) भेट देत या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शाळेत आल्यानंतर त्यांनी परिसर स्वच्छतेची पाहणी केली. इयत्ता पहिलीच्या वर्गात जावून वर्गाची पाहणी केली मराठी इंग्रजी वाचन गणित संख्याज्ञान वाचन पाहिले मुलांनी दोन अंकी व काही मुलांनी तीन अंकी संख्यांचे वाचन केले त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांशी हितगुज केले. यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना तहसीलदार ठोकडे म्हणाल्या की, मी सुद्धा एका खेड्यातून आलेली मुलगी असून मी तहसिलदार झाले, तुम्ही सुद्धा अभ्यास करा व मोठ्या पदावर राहून काम करण्याचे ध्येय ठेवा अशी प्रेरणा त्यांनी मुलांना दिली.
यावेळी सन २०२३ मध्ये शिष्यवृत्ती धारक मुलाचा सत्कार तहसिलदार यांनी केला . ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे व शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नामुळे लोकसहभागातून मुलांना पाणी पिण्यासाठी बोअरवेल घेतला असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली.
शाळेतील शिक्षिका मिराबाई जाधवर व दिपमाला अनंत कवळस यांच्या हस्ते ठोकडे यांचा सन्मान केला .
यावेळी करमाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. सारंगकर, पाडळी गावचे सरपंच, उपसरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य , गावातील नागरिक व शाळेतील शिक्षक उपस्थित होते . शाळेची गुणवत्ता, परिसर स्वच्छता व शैक्षणिक उठाव पाहून तहसीलदारांनी समाधान व्यक्त केले


