केम येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम ग्रामपंचायत व सागर अॅक्सिडेंट व डोळ्यांचे हाॅस्पिटल, इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विठ्ठल मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात एकूण २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ज्या रुग्णांना इंदापूर येथे बोलवण्यात आलेल्या रूग्णांना फेको (रोबोटिका) आधुनिक मशिनद्वारे माफक दरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या शिबिराचे उद्घाटन श्री ऊत्तरेश्वर देवस्थान चे मंहत जयंतगिरी महाराज यांच्या हस्ते पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या वेळी त्यानी केम ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी सरपंच सौ सारिका कोरे, सदस्य गोरख पारखे विजय ओहोळ ए,पी, ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील युवा नेते समीर दादा तळेकर श्री हरि तळेकर, राहुल कोरे, राजेंद्र तळेकर अनंता तळेकर, सुलतान मुलाणी, विष्णू अवघडे, ओंकार अवताडे,तानाजी केंगार, निखिल तळेकर, हनुमंत बिचितकर, कुंभार महाराज,अक्षय केंगार,आवीनाश तळेकर बिचितकर आदि उपस्थित होते या शिबिरात डाॅ, समीर मगर, डॉ काटे, डॉ अर्पणा काटे डॉ गीता मगर यानी रूग्णांची तपासणी केली.