वीट शाळेत चिमुकल्यांचा ‘आनंदी बाजार’ उत्साहात पार पडला
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – वीट येथे जि. प. प्रा. केंद्र शाळेच्या वतीने शाळेच्या प्रांगणात चिमुकल्यांचा आनंदी बाजार भरवण्यात आला. या बाजाराचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधीकारी सुग्रीव नीळ यांच्या हस्ते झाले.
या बाजारामध्ये शालेय जिवनापासून मुलांना व्यवहारीक ज्ञान मिळावे, बोलण्याचे कौशल्य वाढावे, भिती कमी व्हावी व समाजात आपण कसे वागावे याची माहिती व्हावी म्हणुन हा उपक्रम राबवण्यात आला. होतो. या बाजारात मुलांनी पालेभाज्या, गावरान अंडी,शेवग्याच्या शेंग्या, बोरे, लोणचे, पाणी पुरी, मसाले, केळी, वडापाव इत्यादी विकण्यास बसलेली होती.
या उपक्रमासाठी शालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल ढेरे,उपाध्यक्ष योगेश चांदणे व सदस्य सर्व शिक्षक, शिक्षिका, वीटचे सुजान नागरीक यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. स्वावलंबन, चिकाटी, व्यवहार ज्ञान, चिकीत्सक वृत्ती मुलांना मिळवी अशा प्रकारे शाळेच्या मुख्याध्यापक
मीना गोरे यांनी आपले मत मांडले.