केम येथे खंडोबा देवस्थानची यात्रा मोठया उत्साहात
केम (संजय जाधव) – केम येथील निमोनीच्या मळ्यातील खंडोबा देवस्थानची यात्रा मोठया उत्साहात पार पडली. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. येथील जय मल्हार मित्र मंडळाने जेजुरी येथून ज्योत आणली होती. हि ज्योत केम येथे आल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले
१८ जानेवारी रोजी सकाळी देवस्थान कमीटीच्या वतीने श्री स अभिषेक करण्यात आला त्यानंतर १० वा.श्री स नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता पालखीचे गावात प्रस्थान झाले. सोबत मानकऱ्यानी मशाली धरल्या येळकोट,येळकोट जय मल्हार या घोषानी संपूर्ण केम नगरी दुमदुमून गेली. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी केली होती चौकात पालखी आल्यानंतर भारदस्त असा वाघ्या मुरळी चा कार्यक्रम झाला. या मध्ये दहा ताफे सहभागी झाले होते. हा कार्यक्रम तब्बल चार तास झाला. कार्यक्रम पाहण्यासाठी केम व परिसरातील नागरिकांनी तुंडूंब गर्दी केली होती. अकरा वाजता पालखीने मंदिराकडे प्रस्थान ठेवले. हि पालखी मंदिरात बारा वाजता पोहचली. त्यानंतर या पालखी समोर वाघ्या मुरळी च्या दहा ताफ्याचा रात्रभर जागरण गोंधळ घालण्यात आला. सकाळी आठ वाजता खंडोबा चे भक्त हरि वाघे यांनी हाताने लंगर तोडला. हा लंगर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती त्यांनंतर खंडोबाची आरती होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.
या यात्रेसाठी शंकर तळेकर, कांतीलाल तळेकर,भागवत तळेकर, रामचंद्र बोंगाणे, रामा जाधव, गोरख गोधडे, दादा ओंभासे, महादेव तळेकर, अण्णा तळेकर,मच्छिंद्र तळेकर कांतीलाल टोंपे, अक्षय पाटील, त्रिंबक पाटील मल्हारी तळेकर जालिंदर तळेकर, अरुण कारंडे, प्रकाश भोंगळे, संतोष सुरवसे, भिमराव तळेकर, युवराज तळेकर,हरिदास तळेकर,गोरख पाटील,मदन गायकवाड,उत्तरेश्वर मारुती तळेकर, तुकाराम तळेकर,महादेव पळसकर, निखील तळेकर व जय मल्हार मित्र मंडळाने परिश्रम घेतले.