जि. प. वांगी नं 3 शाळेत आनंदी बाजारचे आयोजन -

जि. प. वांगी नं 3 शाळेत आनंदी बाजारचे आयोजन

0

केम (संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील वांगी नं 3 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने सदर बाजारचे आयोजन करण्यात आले होते.

या आनंदी बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय रोकडे यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरपंच मयूर रोकडे होते उपाध्यक्ष लक्ष्मण गोडसे तसेच व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

बाजारात विद्यार्थ्यांनी वेगवेगळी फळे, पालेभाज्या, फळभाज्या, अंडी वडापाव,भजी,चायनीज,भेळ ,चहा यांची दुकाने लावली होती. बाजारात एकूण 38650 रुपयांची उलाढाल झाली. गावात प्रथमच बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी गावातील सर्व नागरिकांनी आपल्या मुलांचे कौतुक करून खरेदीचा आनंद लुटला .मुलांना व्यवहार ज्ञान समजले. आपण व्यवसाय करू शकतो याचा आत्मविश्वास आला.

यावेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य ,शाळा प्रेमी नागरिक,बहुतांश ग्रामस्थ उपस्थित होते. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री आदिनाथ राऊत, श्रीमती उज्वला भोंग, श्री अशोक कणसे, श्री बाळू राठोड व सौ. सुतार यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!