गटविकास अधिकारी सारंगकर यांची पांगरे गावास भेट

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२२: गटविकास अधिकारी डी.आर.सारंगकर यांनी नुकतीच पांगरे गावास भेट दिली आहे.
यावेळी त्यांनी ग्रामीण कृषी कर्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नता कार्यक्रम अंतर्गत नुकतेच पांगरे गावात आगमन झालेले सद्गुर कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत शंभूराजे मस्के, संतोष माने सार्थक खेतकर व आदेश शेंडगे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी कृषी दूतांना त्यांच्या कृषी पदवी काळातील अनुभव सांगितले तसेच कृषी क्षेत्रातील संधींबाबत मार्गदर्शन केले .
यावेळी ग्रामसेवक समाधान कांबळे यांनी गावातील दिनक्रम मांडला तर कृषीदूतांनी सेंद्रीय शेतीचे मार्गदर्शन केले.
यावेळी उपस्थित कृषी विस्तार अधिकारी श्री एल.एम.शेख,कृषी तांत्रिक अधिकारी श्री व्ही. एम.फाळके, ग्रामसेवक समाधान कांबळे , पांगरे गावचे सरपंच श्रीमती प्रा. विजया सोनवणे, वकीलसंघाचे अध्यक्ष अॅड. दत्तात्रय सोनवणे,उपसरपंच श्रीमती मनिषा गायकवाड,धनंजय गायकवाड,शाळा व्यवस्तापन अध्यक्ष महेश शेळके,ग्रा.स.सचिन पिसाळ,ग्रा.स.श्री महेश टेकाळे ,जल सुरक्षक गोपाल कोळी तसेच गावचे प्रतीष्टित ग्रामस्थ व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. या उपक्रमासाठी कृषी दुतांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. कल्याणी ताई नेवसे, संस्थापक शंकर नेवसे, सचिव राजेंद्रजी गोरे, प्रशासकीय अधिकारी सखाराम राजळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के बिटे , कार्यक्रम अधिकारी प्रा.काळे ऋषीकेश व प्रा. यादव एस.व्ही. उपस्थित होते.


