'उपप्रादेशिक परिवहन' व ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनमार्फत 'रस्ता सुरक्षा सप्ताह' कार्यक्रम - करमाळा शहरातून काढली बाईक रॅली.. - Saptahik Sandesh

‘उपप्रादेशिक परिवहन’ व ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनमार्फत ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ कार्यक्रम – करमाळा शहरातून काढली बाईक रॅली..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : ‘उपप्रादेशिक परिवहना’मार्फत ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाअंतर्गत ‘वाहन चालवताना घ्यावयाची काळजी’ याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथील ‘ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन’मार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये करमाळा शहरातून बाईक रॅली काढण्यात आली.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे होते. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.गावडे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना माहिती देताना पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वाहन चालकांनी वाहन चालवत असताना घ्यावयाची काळजी व लोकांकडून होणाऱ्या चुका याबद्दल मार्गदर्शन केले, त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री गावडे यांनी वाहन चालवत असताना दुचाकी,चार चाकी, मोठ्या वाहनधारकांनी कोणत्या नियमाची अंमलबजावणी करावी ते उदाहरणासहित सांगितले, तसेच अपघातामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली.

याच ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ कार्यक्रमाअंतर्गत करमाळा शहरातून काढली बाईक रॅली काढण्यात आली, या बाईक रॅली मध्ये आरटीओ यांची गाडी पुढे त्यापाठीमागे मोटारसायकली आणि त्यांच्या पाठीमागे ड्रायविंग स्कुल च्या गाड्या होत्या. या सर्व गाडयांना समाजप्रबोधन बॅनर लावलेले होते, या कार्यक्रमाचे आयोजन ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांनी केले. यामध्ये प्रामुख्याने ‘साई ड्रायव्हिंग स्कूल’ जेऊर, ‘शौर्य ड्रायव्हिंग स्कूल’ व कृष्णा ड्रायव्हिंग स्कूल करमाळा , ‘थोरात ड्रायव्हिंग स्कूल’ करमाळा, कमलाई ड्रायव्हिंग स्कूल करमाळा त्याचबरोबर शिवरत्न बजाज जेऊर व कमलाई मोटर्स करमाळा यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला सूत्रसंचालन कमलाई मोटर्स चे सतीश रुपनर यांनी केले. व आभार प्रदर्शन अक्षय पोमण यांनी मानले. या कार्यक्रमास अनेक वाहन चालक व नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!