‘भाजपा जिल्हा यूवा मोर्चा’च्या कार्यकारिणीत विवीध पदाधिकाऱ्यांच्या निवडी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुका भाजपा युवा मोर्चासह भाजपा जिल्हा यूवा मोर्चा च्या कार्यकारिणीत विवीध पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत, या निवडी भाजपा जिल्हा यूवामोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आल्या आहेत.
यामध्ये भाजपा यूवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिंदे , भाजपा यूवा मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी ओंकार घोंगडे, भाजपा युवा मोर्चा, तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत राखुंडे, तसेच तालुका उपाध्यक्षपदी अविनाश पवार, संदीप सरडे, क्रांती पाटील यांची तर
तालुका सरचिटणीसपदी विशाल शिंदे पाटील, अनिकेत खाटमोडे, आशिष पाटील व तालुका चिटणीस पदी शुभम बोराडे आणि आप्पा गावडे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच तालुका संपर्कप्रमुख मनोज धुमाळ, कार्यालय प्रमुख विश्वजीत जगदाळे, शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे, शहर उपाध्यक्षपदी प्रशांत पवार,
शहर चिटणीसपदी आकाश पडवळे आदी निवडी घोषीत करून त्यांना भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी निवडी चे पत्र दिले असून, त्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. या निवडीदरम्यान जगताप गटाचे कार्यकर्ते तसेच युवकवर्ग उपस्थित होता.

