केम येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरवात – अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न लागला मार्गी
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचा प्रलंबित प्रश्न प्रहार संघटना व श्री. उत्तरेश्वर युवा परिवर्तनच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे.
अनेक वर्षांपासून पावसाळ्यात येथील नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. केम गाव अनेक छोटया मोठया खेडयांना जोडल्यामुळे याचा वाहतुकिवर परिणाम झाला होता. नाल्याखालून जाताना छोटी-मोठी वाहने अडकत होती. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येताना जाताना आपला जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडून यावे लागत होते तसेच जेष्ठ नागरिक व वाडया वस्तावरील नागरिकांना रात्री, अपरात्री गावात येताना त्रास सहन करावा लागत होता. पावसाळा संपेपर्यंत नागरिक हैराण होत असायचे.
बाहेर गावातील नागरिक या नाल्यातील पाण्यामुळे केम गावात यायला धजवत नव्हते. त्यामुळे केमची बाजारपेठ पावसाळ्यात ओस पडत होती. या संदर्भात प्रहार संघटना व उत्तरेश्वर युवा ग्रुपच्या वतीने रेल्वे विभाकडे पाठपुरावा करणे चालू होते. अखेर याला यश येऊन या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला. यामुळे केम व परिसरातील नागरिकांनी प्रहार संघटनेचे कौतुक केले.
या वेळी प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर , करमाळा मार्केट कमिटी संचालक सागर राजे दौंड, श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपचे अच्युत पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक सागर राजे तळेकर, पैलवान महावीर आबा, युवा नेते महेश तळेकर सर, तळेकर, भाजप जिल्हा सदस्य धनंजय ताकमोगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन रणशिंगारे,डॉक्टर योगेश कुरडे, सोसायटी मा. चेअरमन बाळासाहेब देवकर, आनंद शिंदे, माजी.सरपंच सुभाष दादा कळसाईत, उद्योजक महादेव पाटमास, ग्रामपंचायत सदस्य सागर कुरडे ,पिंटू ओहोळ, गोरख काका पारखे, दादासाहेब गोडसे योगेश ओहोळ, चेअरमन अरुण लोंढे, सतीश खानट, बापू नेते तळेकर, दादासाहेब पारखे, अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.