शेतजमीनीच्या कारणावरून दीर व पुतण्याकडून महिलेस मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शेतीच्या वादावरून शेतात काम करत असलेल्या महिलेस दीर व पुतण्याने लाथ घालून मारहाण केली आहे. यात महिलेचा उजवा हात फॅक्चर झाला आहे. या प्रकरणी कमल विठ्ठल आरकिले रा.भिवरवाडी यांनी फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की २६ जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता मी माझ्या शेतात गवत खुरपत असताना माझा पुतण्या बालाजी आरकिले व दीर महादेव आरकिले हे पाठीमागून येऊन त्यांनी जोराची लाथ माझ्या पाठीत घातली तर माझ्या पतीस विठ्ठल यांना उचलून आपटले. त्यावेळी माझा हात फॅक्चर झाला आहे. तसेच माझ्या पतीस मुक्कामार लागला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

