संतांच्या विचारांचा सुगंध दरवळला पाहिजे : ह.भ.प.ताराबाई अडसूळ - Saptahik Sandesh

संतांच्या विचारांचा सुगंध दरवळला पाहिजे : ह.भ.प.ताराबाई अडसूळ

कंदर / प्रतिनिधी : संदीप कांबळे : संताचे विचार समाजास तारणारे आहेत.यामुळे संतांचे विचार आत्मसात करून ते आचरणात आणले पाहिजेत.घरात,समाजात वावरताना आपल्यामध्ये संतांच्या विचाराचा सुगंध दरवळला पाहिजे असे प्रतिपादन वरवंड (पुणे) येथील हभप ताराबाई अडसूळ यांनी केले.

माढा तालुक्यातील मौजे भुईंजे येथील संत शिरोमणी श्री रविदास महाराज मंदीर येथे श्री संत रविदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हभप ताराबाई अडसूळ या उपस्थितांना उपदेश करताना बोलत होत्या.

यावेळी मंदिर ट्रष्टचे अध्यक्ष राजाभाऊ यांनी मनोगत व्यक्त करताना संत रविदास महाराज यांच्या दोह्याचा अर्थ समजून सांगितला. ते म्हणाले की, माणसांनी मध माश्यांचा गुण घेतला पाहिजे.मधमाशा एकत्र राहूनही त्या कधी भांडत नाहीत,त्या घाणीवर बसत नाहीत.संकटसमयी एकत्र लढतात.त्याप्रमाणे आपण सर्वांनी वाईट दुर्गुण,वाईट संगतीपासून दूर व एकोप्याने राहिले पाहिजे.

यावेळी मंदिराच्या उभारणीसाठी व अन्नदान कार्यक्रमासाठी सढळ हाताने निधी देणारे विठ्ठल राऊत,हरिदास अडसूळ,बाळासो गवळी, शशिकांत कोळवले,पांडुरंग मोरे,दगडू माळी,विष्णू कोळवले,प्रशांत कांबळे आदींचा सन्मान करण्यात आला. मंदिरात सकाळी ९ वा.संत रविदास महाराज अरदास,आरती,प्रवचन,मार्गदर्शन,पुष्पवृष्टी करण्यात आली.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यावेळी हनुमंत काळे,रामभाऊ पवार,पांडुरंग मोरे यांनी ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने विचार व्यक्त केले. या कार्यक्रमास अमित शिंदे,नवनाथ लोखंडे,माजी सरपंच हनुमंत चव्हाण,मधुकर भगत,अजिनाथ कांबळे,शिवाजी लोंढे,मारुती लोंढे,मारुती माढकर,निवृत्ती शिंदे, प्रशांत कांबळे,संदीप कांबळे,डॉ.अजय पवार,शोभा शिंदे,मोनिका शिंदे,वैशाली शिंदे यांच्यासह परिसरातून आलेले समाज बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन कृषी अधिकारी अनिल कांबळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!