करमाळा लोकअदालतमध्ये 134 प्रकरणे निकाली – 2 कोटी 2 लाख 63 हजार रक्कम वसुली..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आज (ता.3) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नरेंद्र जोशी व तालुका विधी सेवा समिती अध्यक्षा न्या. एम.पी.एखे यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते, या लोकअदालतमध्ये एकूण 134 प्रकरणे निकाली होवून जवळपास 2 कोटी 2 लाख 63 हजार एवढी रक्कम वसुली झाली आहे.
लोकअदालतचे उद्घाटन पॅनल प्रमुख तसेच विधी सेवा समिती अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर करमाळा एम.पी.एखे यांचे हस्ते करण्यात आले, याप्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री उपस्थित होते. याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष ॲड.दत्तात्रय सोनवणे तसेच करमाळा बारचे सदस्य उपस्थित होते.
या लोकअदालत मध्ये पेंडिग 1233 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यापैकी 63 प्रकरणे निकाली होवून त्यात 1 कोटी 49 लाख 9 हजार 953/- रुपये रक्कम वसुली झाली आहे. तसेच दाखल पूर्व 1950 प्रकरणे ठेवण्यात आली होती यामध्ये 53 लाख 53 हजार 268/- रुपये रक्कम वसुली झाली आहे. या लोकाअदालतसाठी करमाळा वकील संघाचे सद्स्य तसेच पक्षकार उपस्थित होते.
या लोकआदालतमध्ये स्पेशल मुकदमा नं 786/2023 मध्ये एकूण 30 कोटी च्या प्रॉपर्टीसाठी दावा दाखल करण्यात आला होता, सदर दाव्यामध्ये एकूण 41 लाख रुपये मध्ये तोडजोड होऊन त्यापैकी 25 लाख रुपये लहान मुलाला देऊन प्रकरण तडजोड करण्यात आले.