'आर्थिक क्षमता' शासनाकडे सादर केलेल्या ठेकेदारांच्याच निविदा पात्र करा - जनशक्ती संघटनेची मागणी - Saptahik Sandesh

‘आर्थिक क्षमता’ शासनाकडे सादर केलेल्या ठेकेदारांच्याच निविदा पात्र करा – जनशक्ती संघटनेची मागणी

यासंदर्भात बांधकाम विभाग क्र.2 कार्यकारी अभियंता एच. चौगुले यांना निवेदन देताना जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे-पाटील यांच्यासह कार्यकर्ते

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा प्रक्रिये अंतर्गत ठेकेदारातर्फे निविदा सादर करताना निविदा भरण्याची क्षमता अर्थात ‘बीड कॅपॅसिटी’ संदर्भात माहिती शासनाकडे सादर करणे अनिवार्य असल्याचा शासन निर्णय ७ डिसेंबर २०२३ झाला असून ज्या ठेकेदारांनी ऑनलाइन प्रणाली द्वारे ‘निविदा भरण्याची क्षमता’ शासनाला सादर केली आहे अशाच ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत पात्र करावे, ज्या ठेकेदारांनी आर्थिक क्षमता अर्थात निविदा भरण्याची क्षमता शासनाकडे सादर केली नाही अशा ठेकेदारांना अपात्र करावे अशी मागणी जनशक्तीचे प्रमुख अतुल खूपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली असून यामध्ये काही गैरव्यवहार झाल्यास याच्या सखोल चौकशीची मागणी करून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्र्यांसह इतरांना दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये विविध कामांच्या निविदा (टेंडर) प्रसिद्ध झाली आहेत. त्या नोटीसी मध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन बीड कॅपॅसिटी अर्थात निविदा भरण्याची प्रक्रियेत मालमत्तेसह ऑनलाइन माहिती भरणे आवश्यक आहे.तरीही आपली माहिती लपवून ठेवत शासनाची फसवणूक करण्याच्या हेतूने अनेक ठेकेदारांनी आपली आर्थिक क्षमता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे शासनाकडे पुरविली नाही. त्यामुळे ज्या ठेकेदारांनी बीड कॅपॅसिटी सिद्ध केली नाही, अशा सर्वच ठेकेदारांना या प्रक्रियेतून बाद करावे अशी मागणी करून त्यांनी या निविदा प्रक्रियेत काही गैरव्यवहार झाल्यास अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करून न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!