लोकमंगल नागरी पतसंस्थेच्यावतीने ‘कर्तुत्ववान महिलांचा’ सन्मान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : लोकमंगल नागरी पतसंस्थेच्यावतीने महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महीलांचा सन्मान करण्यात आला, वांगी नं २ (ता.करमाळा) येथील प्राथमिक शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेऊर येथील भारत महाविद्यालयाच्या प्रा.सुनिता कांबळे उपस्थित होत्या.
याप्रसंगी जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, शाखा व्यवस्थापक संदीप शिंदे यांनी प्रास्ताविक करून पतसंस्थेच्या विविध योजनांची माहिती दिली, यावेळी कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शेटफळ येथील महिला शेतकरी हर्षाली नाईकनवरे यांचा तर शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वैष्णवी बेंद्रे , स्पर्धा परिक्षेतील यश मिळवून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या उपसंचालकपदी निवड झाल्याबद्दल सुप्रिया रैकडे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विमल कळसाईत,तर राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सुवर्णा कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राध्यापक सुनिता कांबळे म्हणाले की, आजच्या या सत्कार समारंभ कार्यक्रमाने महिला समाजात कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत हे सिद्ध झाले आहे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल लोकमंगल पतसंस्थेचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाला भाग्यश्री रोकडे,कळसाईत ताई बेंद्रे मॅडम खानट ढवळे, गावातील विविध बचतगटाच्या अध्यक्षा अंगणवाडी व आशा ताई यांच्याबरोबरच गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

