अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेच्यावतीने ओंकार जोशी यांचा सत्कार संपन्न - Saptahik Sandesh

अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेच्यावतीने ओंकार जोशी यांचा सत्कार संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : जीवनात ध्येय गाठण्यासाठी जिद्दीने चिकाटीने परिश्रम केल्यास यश‌ मिळवता येते ओंकार जोशी यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळवले असुन समाजाने आदर्श घेणे काळाची गरज असल्याचे मत अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक करमाळा व भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी तालुकाअध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी व्यक्त केले. अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्थेच्यावतीने कृषी सहाय्यक अधिकारीपदी झरे येथील शेतकरी कुटुंबातील ओंकार गजानन जोशी यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना संतोष काका कुलकर्णी म्हणाले की आपण मनामध्ये जिद्द ठेवुन‌ कार्य केल्यास कुठलेही कठीण कार्यात आपण यश मिळवु शकतो त्याला परिस्थिती आडवी येत नाही . ओंकार जोशी एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही कुठलाही वारसा नसताना कुठलेही साधन स्पर्धा परीक्षा क्लास न लावता स्वतः अभ्यास करून कृषी सहाय्यक अधिकारीपदी त्यांची निवड होणे हे कौतुकास्पद आहे.त्याचा आदर्श सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांनी घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात ध्येय प्राप्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास झरे गावचे माजी सरपंच शिवाजी पिसाळ, भाजपाचे जिल्हा सचिव शाम सिंधी, जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, भाजप अध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके,श्री बाळासाहेब कुलकर्णी,अरूण जोशी,राजु माने, शंकर कांबळे,संतोष जोशी, संजय जोशी, गजानन जोशी, संतोष कुलकर्णी,मयुर कुलकर्णी,सागर कुलकर्णी, आशुतोष जोशी, राजेंद्र सुर्यपुजारी, निलेश गंधे शुभम कुलकर्णी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष काका कुलकर्णी यांनी केले तर आभार निलेश गंधे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!