बोरगाव येथील पावणेसतरा वयाची मुलीस पळविले..

करमाळा संदेश / प्रतिनिधी
करमाळा : बोरगाव (ता. करमाळा) येथील १६ वर्षे ७ महिन्याची मुलगी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेली आहे.
या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, माझी १६ वर्षे ७ महिन्याच्या मुलीने बारावीची परीक्षा दिली होती.
ती एक वर्षभर करमाळा शहरात शिक्षणासाठी रहावयास होती. परीक्षा झाल्यानंतर १६ मार्चला ती घरी आली. २२ मार्चला ती खोलीवरील सामान घेऊन येते म्हणून करमाळ्याला गेली ती परत आलीच नाही. यावरून तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.



