करमाळ्यात 'भाजपा'ची बैठक - लोकसभा निवडणुकीवर चर्चा.. -

करमाळ्यात ‘भाजपा’ची बैठक – लोकसभा निवडणुकीवर चर्चा..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणुक समितीची बैठक करमाळा शहरातील केमिस्ट भवन येथे 28 मार्च रोजी लोकसभा समन्वयक राजकुमार नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

या बैठकीसाठी माढा लोकसभेचे संयोजक जयकुमार शिंदे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे उपस्थित होते, या बैठकीचे आयोजन विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश चिवटे यांनी केले होते. या बैठकीमध्ये लोकसभेच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात करावयाच्या कामकाजा विषयी लोकसभेचे संयोजक जयकुमार शिंदे व सरचिटणीस सचिन शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी राजकुमार पाटील म्हणाले की, करमाळा विधानसभेमध्ये आज सर्व आजी-माजी आमदार व भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीमागे उभी असून यावेळेस करमाळा तालुक्यातुन जास्तीत जास्त मताचा लीड आपण द्यावा व पार्टीच्या संघटनात्मक कामाच्या दृष्टिकोनातून सर्व कामे आपण करावीत असे सांगितले.

या बैठकीसाठी भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहर मंडल अध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष पै.अफसर जाधव, विधानसभा सह.प्रभारी डॉ.अभिजीत मुरूमकर, विधानसभा संयोजक सोमनाथ घाडगे ,सहसंयोजक आजिनाथ सुरवसे, अविनाश गोरे, लोकसभा विस्तारक अनंता राऊत, रविकिरण माळवे ,उपसरपंच अमोल पवार, लक्ष्मण शेंडगे, बिभीषण गव्हाणे, सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे, नरेंद्र ठाकूर,विनोद महानवर ,जयंत काळे पाटील, महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे, रेणुका राऊत, पूजा माने, चंपावती कांबळे, सागर नागटिळक, हनुमंत रणदिवे, भैय्या गोसावी, प्रकाश ननवरे, हर्षद गाडे ,नितीन कानगुडे, सचिन कानगुडे, पत्रकार दिनेश मडके, सचिन चव्हाण, नितीन निकम, प्रवीण शेळके, केम शहराध्यक्ष विकास कळसाईत, ईश्वर मोरे, सयाजी जाधव,सौदागर देशमाने, दादासाहेब गाडे ,विजयकुमार नागवडे, सरपंच विष्णू रंदवे, गणेश माने ,मस्तान कुरेशी ,कपिल मंडलिक ,प्रवीण बिनवडे , पोपट शिंदे, संजय जमदाडे , संजय किरवे, सचिन पांढरे,संदिप काळे, सचिन कणसे, गणेश वाशिंबेकर, शिवनाथ घोलप व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि चुनाव समितीचे सदस्य उपस्थित होते,या बैठकीचे सूत्रसंचालन भगवानगिरी गोसावी यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष उमेश मगर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!