मलवडी येथील सारंग देवकर याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी येथील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सारंग रेवणनाथ देवकर याची जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली.तसेच ऑल इंडिया सैनिकी स्कूल साठी 266/300 गुण घेऊन निवड झाली. त्याबद्दल शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी करमाळा गटविकास अधिकारी मनोज राऊत,गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी जयवंत नलवडे , केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे, साईनाथ देवकर , तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू व भगिनी यांनी त्याला पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
त्याला सारिका चेंडगे, तुकाराम तळेकर, वर्गशिक्षिका राणी सातव मॅडम ,ज्ञानदा परिवारातील मयुरी सुतार मॅडम, अविनाश सुतार सर ,अक्षय सुतार सर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सारंग चे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे.


