रमजान महिन्याचे औचित्य साधून सावंत गटाकडून मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : शहरातील जामा मस्जिद मध्ये ३ एप्रिल रोजी सावंत गटाच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, मुस्लिम धर्मामध्ये पवित्र समजला जाणारा रमजान महिन्याचे औचित्य साधून माजी नगरसेवक संजय सावंत यांनी या इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते, यावेळी जामा मस्जिद मध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन सायंकाळी पावणे सात वाजता मौलानाच्या प्रार्थनेनंतर रोजा सोडण्यात आला.
यावेळी सावंत गटाचे नेते सुनिलबापू सावंत, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय शिंदे, माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी,करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवा लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आझाद शेख, मुस्तकीन पठाण, जिशान कबीर, जयंत दळवी,आलीम शेख, विशाल परदेशी, सिध्दार्थ वाघमारे, माजी नगरसेवक दिपक सुपेकर आदी जण उपस्थित होते. रोजा ईप्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मजहर नालबंद, जामा मस्जिद चे विश्वस्त जमीर सय्यद, वाजीद शेख, साजीद बेग, आनंद रोडे, सागर सामसे, फिरोज बेग, अरबाज बेग, नागेश उबाळे, अकबर बेग, इम्रान घोडके, जहाँगीर बेग आदी जणांनी परिश्रम घेतले.


