संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत उद्योजक विजय पवार यांचे कार्य प्रेरणादायी : डॉ.ॲड बाबुराव हिरडे - Saptahik Sandesh

संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत उद्योजक विजय पवार यांचे कार्य प्रेरणादायी : डॉ.ॲड बाबुराव हिरडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा तालुक्यामध्ये विजयदादा पवार यांनी संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत सामाजिक चळवळीत योगदान देण्याचे काम केले असून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार बाबुराव हिरडे यांनी व्यक्त केले.

करमाळा येथील शुभ सकाळग्रुपच्यावतीने विजयदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी पुढे बोलताना ॲड.बाबुराव हिरडे म्हणाले की, विजयदादा पवार यांनी सुरुवातीच्या काळामध्ये स्पेअर पार्ट दुकानापासून सुरुवात करून त्यानंतर जे सी बी, पोकलेन जे के टायर एजन्सी अशा व्यवसायामधुन उत्कर्ष केला.सामाजिक बा़धिलकीतून मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे . तसेच शैक्षणिक क्षेत्रात रणजितसिंह मोहिते पाटील महाविद्यालय स्थापना करून करमाळयातील होतकरू विद्यार्थ्यांना बी सी ए.बी.बी ए बी एससी कोर्स चालू केले.त्याचप्रमाणे राजकारणामध्ये. लोकनेते स्व. दिगंबरराव बागल, विलासराव घुमरे सर यांच्या बरोबर काम केले आहे.

याचबरोबर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बरोबर काम करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम केले.त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष म्हणून काम केले. हे काम करताना कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाबीजवर संचालकपदी निवड केली होती. राजकारणात सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे, कुणाच्या छत्राखाली काम करण्यापेक्षा स्वाभिमानाने आत्मनिर्भर तिने गोरगरिबाची कामे स्वबळावर करण्यासाठी दादा सदैव कार्यरत राहिले आहे. त्यांचे कार्य करमाळा तालुक्यातील जनतेसाठी व पिढीसाठी प्रेरणादायी आहे. असेही ॲड बाबुराव हिरडे यांनी म्हटले आहे. या सत्कार समारंभास उद्योजक मनोज गांधी, डॉ अनिल मेहता उद्योजक बाळासाहेब रोडे , पत्रकार दिनेश मडके, उद्योजक शिवकुमार चिवटे, सिध्देश्वर डास यांच्यासह करमाळा शुभ सकाळ ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!