करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांची हजेरी – ईद-उल-फित्र उत्साहात साजरी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहर व तालुक्यामध्ये ईद-उल-फित्र उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी यांनी केले व खुतबा पठण करमाळा तालुका आणि शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले.
याप्रसंगी शहर काझी यांनी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, कोणत्याही व्यक्तीने केलेल्या वाईट कामाची शिक्षा त्याला जगात असतानाच भेटेल व ती व्यक्ती कोणत्या पदावर आहे याला महत्व नाही, तसेच समाजातील सर्वच घटकांवर झालेल्या अत्याचाराचा जाहीर शब्दात निषेध करण्यात येत आहे.
तसेच देशात द्वेष भावना पसरवण्याचे काम सोशल मिडीया मार्फत चालु आहे, याला सर्व सामान्य जनतेन बळी पडू नये असेही त्यांनी सांगितले. यावेळी करमाळा शहरातील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली व एकमेकांना ईद च्या शुभेच्छा दिल्या.