भिंत फोडून चोरट्याने दोन लाख रूपये केले लंपास – करमाळ्यात भरदिवसा घडली घटना..

करमाळा / संदेश प्रतिनिधी –
करमाळा : भरदिवसा करमाळा शहरातील मारवाड गल्लीतील घराची भिंत फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले रोख २ लाख रूपये चोरून नेले आहे. हा प्रकार ५ एप्रिलला दुपारी साडेबारा ते साडेतीनच्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी ॲड. दिपक उमेदमल कटारिया यांनी फिर्याद
दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की ५ एप्रिलला मी दुपारी साडेबारा वाजता घरातून दुकानात गेलो होतो व परत साडेतीन वाजता घरी आलो असता, घरातील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी कपाटात ठेवलेले दोन लाख रूपये चोरीला गेल्याचे समजले. चोरट्यांनी घराच्या मागील बाजुची भिंत फोडून घरात प्रवेश करून ही चोरी केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे करत आहेत.


