किर्तीध्वजसिंह मोहिते-पाटील यांची केत्तूर गावास भेट

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज दिनांक पाच मे रोजी करमाळा तालुक्यातील केत्तूर क्रमांक दोन येथे युवा नेते कीर्तीध्वज सिंह मोहिते पाटील यांचा गाव भेट दौरा संपन्न झाला.

यावेळी पश्चिम भागाचे युवा नेते शहाजी बापू पाटील यांनी सांगितले पश्चिम भाग व केत्तूर परिसर हा नारायण आबा पाटील यांचा बालेकिल्ला असून आम्ही सर्व केत्तूरकर मोहिते पाटलांना भरघोस प्रमाणात लीड देऊ व विरोधकांची झोप उडवून टाकू असा इशारा दिला. यावेळी सर्व परिसरातील नेते मंडळी व केत्तूर ग्रामस्थ उपस्थित होते.


